महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून पोलीस उपनिरीक्षक महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, उस्मानाबादेतील घटना - suicide

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळल्याने तिने, असे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून पोलीस उपनिरीक्षक महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

By

Published : May 31, 2019, 3:11 PM IST

उस्मानाबाद- लैंगिक छळप्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षकांवर प्रशासनाने कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केल्यामुळे एका पोलीस उपनिरीक्षक महिलेने शुक्रवारी सकाळी चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तसेच वरिष्ठांच्या जाचाला कंटाळल्याने तिने, असे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून पोलीस उपनिरीक्षक महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, उस्मानाबादेतील घटना

मार्च महिन्यात पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असताना त्याच पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांनी त्यांचा लैंगिक छळ केला होता. तशी त्यांनी २८ मार्चला स्टेशन डायरीमध्ये नोंद केली होती. त्यानंतर त्यांची दुसऱया पोलीस ठाण्यामध्ये बदली करण्यात आली होती. या प्रकरणाची गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरू होती. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्यावर दबाब आणत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक महिलेच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details