उस्मानाबाद- तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोर भेसळयुक्त कुंकू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. या कुंकवाला आयएसआय मानांकन नाही. त्यामुळे या विक्रीवर व्यापार्यांनी बंदी घालण्याची शिफारस अन्न आणि औषध प्रशासन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
हेही वाचा - उस्मानाबादमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू , ग्रामस्थ संतप्त
तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची वर्षभर गर्दी असते. महिलांसाठी आणि देवीसाठी कुंकू म्हणजे सौभाग्याच लेणे समजले जाते. त्यामुळे मंदिरासमोर भेसळयुक्त कुंकू विक्रीचे प्रमाण अधिक आहे. नवरात्र उत्सवाच्या कालावधीमध्ये ढीग मांडून खुल्या पद्धतीने या ठिकाणी व्यापारी कुंकू विक्री करतात.