महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबादेतील कारसेवकांनी केली श्रीरामाची पूजा; जागवल्या 'त्या' आठवणी... - Osmanabad kar sevak news

अयोध्येत उभा असलेली बाबरी मशीद पाडण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातील कारसेवकांनी प्रयत्न केले. असेच कारसेवक उस्मानाबादेतील पाडोळी या गावातील आहेत. 1992 साली बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यासाठी जिल्ह्यातून काही कारसेवक अयोध्या येथे गेले होते.

kar sevak
उस्मानाबादेतील कारसेवकांनी केली श्रीरामाची पूजा

By

Published : Aug 5, 2020, 8:30 PM IST

उस्मानाबाद- अयोध्येतील रामजन्मभूमी येथे भूमीपूजनाचा ऐतिहासिक सोहळा उत्साहात साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भूमीपूजन करण्यात आले आहे. अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभारण्यात यावे यासाठी कारसेवकांनी योगदान दिले आहे. यासंदर्भात 'ई टीव्ही भारत'ने उस्मानाबाद येथील कारसेवकांसोबत संवाद साधला...

उस्मानाबादेतील कारसेवकांनी केली श्रीरामाची पूजा

जिल्ह्यातील पाडोळी येथील बाबुराव पुजारी यांनी अयोध्या येथील बाबरी मशीद पाडण्यासाठी हातभार लावला असून, पुजारी यांच्यासह पाडुळी गावातील आणि आजूबाजूच्या गावातील नागरिकही अयोध्या येथे गेले होते. विश्व हिंदू परिषदेच्या आदेशाने त्यांनी अयोध्या नगरी गाठली होती.

उस्मानाबादेतील कारसेवकांनी केली श्रीरामाची पूजा

रामजन्मभूमी येथे भूमीपूजनाचा ऐतिहासिक सोहळा उत्साहात पार पडला. अयोध्येत राम मंदिर उभारण्यात यावे असे प्रत्येक हिंदू धर्मीय लोकांची भावना होती. अयोध्येत उभा असलेली बाबरी मशीद पाडण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातील कारसेवकांनी प्रयत्न केले. असेच कारसेवक उस्मानाबादेतील पाडोळी या गावातील आहेत. 1992 साली बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यासाठी जिल्ह्यातून काही कारसेवक अयोध्या येथे गेले होते. या कारसेवकांनी राम मंदिर उभा करण्यात यावे यासाठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. आज राम मंदिराचे भूमीपूजन झाल्याने या कारसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील कारसेवकांनी अयोध्या येथे भूमीपूजन सुरू असताना घरामध्ये दिवे लावत घरावर भगवा झेंडा लावला. त्याचबरोबर श्रीरामाच्या फोटोसमोर बसून रामनामाचा जयघोष करत श्रीरामाला अभिवादन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details