उस्मानाबाद- शिखर बँक घोटाळा प्रकरणी 'ईडी'ने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा नोंदविल्याचे तीव्र पडसाद आज (शुक्रवारी) जिल्ह्यात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कळंब शहरात कडेकोट बंद पाळण्यात आला. कळंब शहरामध्ये सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरात रॅली काढत निषेध नोंदवला.
शरद पवारांवरील 'ईडी'च्या कारवाई निषेधार्थ कळंब शहरात कडकडीत बंद - राष्ट्रवादी काँग्रेसने कळंब शहरात कडेकोट बंद पाळला
शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा नोंदविल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने कळंब शहरात कडेकोट बंद पाळला.

कळंब शहरात कडकडीत बंद
कळंब शहरात कडकडीत बंद
हेही वाचा - ईडी प्रकरण : न्यायालयाच्या आदेशानेच गुन्हे दाखल - रावसाहेब दानवे
राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे हे पहिलेच आंदोलन आहे. त्यामुळे हे आंदोलन यशस्वी होईल का? याबद्दल शंका व्यक्त केली जात होती. मात्र, या आंदोलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस, शेकाप आणि विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा देत शरद पवार यांच्यावरील कारवाईचा निषेध नोंदवला.