उस्मानाबाद - अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक उशिरा आल्याने टीका केली जात होती. यावर भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्य सरकारच जबाबदार असल्याचे म्हटले होते. तर आता पाटील यांच्यावर शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी पलटवार केला आहे.
आमदार कैलास पाटील यांचा पलटवार
जिल्ह्यात केंद्रीय पथकावर टीका केली जात होती. राज्य सरकारने लवकरात लवकर गोषवारा केंद्र सरकारला पाठवला नसल्याने या पथकाला पाहणी करायला येण्यासाठी उशीर झाला असल्याचे स्पष्टीकरण राणाजगजितसिंह यांनी दिले होते. यावर कैलास पाटील यांनी पलटवार केला आहे. इतर प्रकरणात विनाकारण ज्या तत्परतेने केंद्र सरकार हस्तक्षेप करते त्याच तळमळीने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यायला हवा होता, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच जर खरंच केंद्र सरकारला शेतकऱ्यांची काळजी असती तर राज्यसरकारच्या गोषवाऱ्याची वाट न पाहता केंद्रीय पथकाने पाहणी करण्यासाठी यायला हवे होते असेही आमदार कैलास पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -टॉप्स ग्रुप प्रकरण : विहंग सरनाईकची ईडीकडून पाच तास चौकशी
हेही वाचा -कोरोना ३.०? ब्रिटनमध्ये आढळले कोरोनाचे आणखी एक विकसीत रुप; जुन्या विषाणूपेक्षा अधिक संसर्गजन्य