उस्मानाबाद- येथील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप श्रीराम इंगळे यांनी पत्रकार परिषदेत केला. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये या योजनेअंतर्गत दाखल झालेल्या रुग्णांकडून ही योजना पूर्णपणे मोफत असताना नियमबाह्य रित्या पैसे घेतले जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
जन आरोग्य योजनेअंतर्गत हॉस्पिटलमध्ये होतोय गैरव्यवहार- इंगळे - Osmanabad
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप श्रीराम इंगळे यांनी पत्रकार परिषदेत केला. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये या योजनेअंतर्गत दाखल झालेल्या रुग्णांकडून ही योजना पूर्णपणे मोफत असताना नियमबाह्य उकळले जात असल्याची तक्रार त्यांनी केली.
इंगळे यांनी माहिती अधिकारात मागितलेल्या माहिती मध्ये सह्याद्री हॉस्पिटलला या योजनेतून शासनाकडून जवळपास 7 कोटी रुपये मिळाले असल्याची माहिती दिली. दि.6 नोव्हेंबर 2015 ते 23 जानेवारी 2019 या कालावधीत सह्याद्री हॉस्पिटलला सात कोटी 66 लाख 72 हजार 125 इतकी रक्कम मिळाली आहे. ही माहिती इंगळे यांना माहिती अधिकाराखाली मिळाली आहे. एवढी रक्कम शासनाकडून मिळूनही त्याचा या योजनेत समाविष्ट होत असलेल्या रुग्णांकडून असेच पैसे उकळले असल्याची तक्रार इंगळे यांनी केली आहे.