उस्मानाबाद- कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहे. मात्र, उपाययोजनांकडे दुर्लक्ष करत नागरिक घराबाहेर पडत आहे. त्यामुळे, जिल्हा प्रशासनाने उद्या जिल्ह्यात 'जनता कर्फ्यू' लागू केले आहे. या काळात लोकांनी घरामध्येच राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उद्या उस्मानाबादमध्ये जनता कर्फ्यू
जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये, घरातच बसून राहावे. प्रशासन आपल्या सेवेसाठी घराबाहेर थांबले असून आपण प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन घरातच बसून राहिल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही, असे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी सांगितले.
प्रतिकात्मक
जनता कर्फ्यूच्या दरम्यान रोजच्या प्रमाणे रुग्णालये, औषधी दुकाने व दूध विक्रीचे दुकाने सुरू राहणार आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये, घरातच बसून राहावे. प्रशासन आपल्या सेवेसाठी घराबाहेर थांबले असून आपण प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन घरातच बसून राहिल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही, असे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी सांगितले.
हेही वाचा-देशात संचारबंदी मात्र 'या' गावात रस्त्याचे काम सुरूच