उस्मानाबाद- निसर्गाच्या तांडवाने पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार उडवला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात मुसळधार पावसाने सर्वञ महापूर आला आहे. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून, हजारो कुटुंब यामुळे उद्धवस्त झाले आहेत. आता अनेक मदतीचे हात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. तुळजापूर तालुक्यातील अशोक जगदाळे यांनी मदतीस हातभार लावत, दमयंती हरीदास जगदाळे प्रतिष्ठाण, दृष्ठी उद्योग समुह मुंबई व ओखार्ड डॉस्पीटल मुंबई यांच्या विद्यमाने पूरग्रस्त भागात नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवणार आहेत.
पूरग्रस्तांच्या आरोग्य सेवेसाठी तुळजापुरातील जगदाळे प्रतिष्ठानचा पुढाकार
चार फिरते आरोग्य केंद्र, औषधे व तज्ञ डॉक्टरांचे पथक पाठवण्यात येणार आहे. हे पथक आठ दिवस पूरग्रस्त भागात फिरुन नागरिकांची आरोग्य तपासणी, डेग्यु , मलेरिया, ब्लडप्रेशर, मधुमिया व सर्व साथीच्या आजारांवर तात्काळ तपासणी करुन इलाज केला जाणार आहे.
यासाठी चार फिरते आरोग्य केंद्र, औषधे व तज्ञ डॉक्टरांचे पथक पाठवण्यात येणार आहे. हे पथक आठ दिवस पूरग्रस्त भागात फिरुन नागरिकांची आरोग्य तपासणी, डेग्यु , मलेरिया, ब्लडप्रेशर, मधुमिया व सर्व साथीच्या आजारांवर तात्काळ तपासणी करुन इलाज केला जाणार आहे. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखवून डॉक्टरांचे पथक असलेली गाडी कोल्हापूरला पाठवण्यात आली आहे. यावेळी ओखार्ड हाँस्पीटलचे जयकिशन गुप्ता, डॉ. विकास चोबे, डॉ. आनिता राकेश, डॉ आभिषेक मोरे, अमोल कांबळे आदी उपस्थित होते.