उस्मानाबाद -उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू होताच जलजन्य आजारांचे प्रमाण वाढते नागरिकांमध्ये डेंगू, मलेरिया, टायफॉईड असे आजार उद्भवतात. या पार्श्वभूमीवर 'वातावरणातील बदलामुळे नागरिकांनी सावध राहून स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे.' अशी सुचना उस्मानाबाद जिल्हा रूग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर राज गलांडे यांनी केली.
वातावरणातील बदलामुळे मागील पाच-सहा वर्षापासून देशासह राज्याला सतावणारा 'स्वाइन फ्लू' पुन्हा येऊ शकतो अशी शक्यताही डॉक्टर राज गलांडे यांनी व्यक्त केली आहे. सध्या जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्ण तुरळक असून मलेरियाच्या रुग्णांची संख्या नगण्य असल्याचे डॉक्टर राज गलांडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.