उस्मानाबाद - चरित्र्यांच्या संशयावरून पत्नीसह सासूची जावायाने कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना परंडा तालूक्यातील सरणवाडी येथे २८ रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी मारेकरी हरिश्चंद्र जाधव याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
धक्कादायक; चरित्र्याच्या संशयावरून पत्नीसह सासूची कुऱ्हाडीने हत्या, परिसरात दहशत - चरित्र्यांच्या संशयावरून पत्नीचा खून
सरणवाडी येथील हरिश्चंद्र जाधवचा सारीकासोबत १७ वर्षापुर्वी विवाह झाला होता. त्याना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मागील ३ ते ४ वर्षापासून हरिश्चंद्र हा पत्नी सारीकाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने सतत भांडणे होत होते.
![धक्कादायक; चरित्र्याच्या संशयावरून पत्नीसह सासूची कुऱ्हाडीने हत्या, परिसरात दहशत police](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-09:38:47:1598717327-mh-osm-02-crime-7204246-29082020213357-2908f-1598717037-864.jpg)
सरणवाडी येथील हरिश्चंद्र जाधवचा सारीकासोबत १७ वर्षापुर्वी विवाह झाला होता. त्याना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मागील ३ ते ४ वर्षापासून हरिश्चंद्र हा पत्नी सारीकाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने सतत भांडणे होत होते. गेल्या ७ ते ८ माहिण्यापासून सारीका आई-वडिलांकडे पुणे येथे राहत होती. तर मुलगा , समाधान व मुलगी ऋतुजा हे सरणवाडी येथे राहत होते.
मुलांना पुणे येथे घेऊन जान्यासाठी सारीका जाधव आणि तिची आई लक्ष्मी क्षीरसागरसह २८ रोजी सरणवाडी येथे आली होती. मुलांना पाठविण्याच्या कारणावरून हरिश्चंद्र व सारीका यांच्यात भांडणे झाली. यावेळी हरिश्चंद्रने पत्नी सारीकाच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला. दरम्यान भांडण सोडवण्यासाठी लक्ष्मी क्षीरसागर गेल्या असता त्यांच्यावर देखील कुऱ्हाडीने हल्ला केला. यामध्ये सारीका आणि तिच्या आईचा जागीच मृत्यू झाला. लक्ष्मी क्षीरसागर यांच्या मुलाने तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपी हरिश्चंद्र जाधव याच्याविरूध्द परंडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक सय्यद हे करीत आहेत.