उस्मानाबाद -वृद्धापकाळात सर्वांत जवळची व्यक्ती म्हणून पत्नीकडे पाहिले जाते. आयुष्यभर साथ दिल्यानंतर तिचे अचानक जाणे जीवाला चटका लावणारे असते, काही लोकांना या धक्क्यातून सावरणे कठीण जाते. जिल्ह्यामधील लोहारा तालुक्यातील फणेपुर येथे पत्नीच्या निधनानंतर पतीनेही जीव सोडल्याची घटना घडली. गोपीचंद माळी (वय-७८) आणि छगुबाई गोपीचंद माळी (वय-७२) अशी या वृद्ध दाम्पत्याची नावे आहेत.
पत्नीच्या निधनाचे दुःख अनावर; पतीचाही हृदयविकाराने मृत्यू - उस्मानाबाद न्यूज
जिल्ह्यामधील लोहारा तालुक्यातील फणेपूर येथे पत्नीच्या निधनानंतर पतीनेही जीव सोडल्याची घटना घडली. गोपीचंद माळी (वय-७८) आणि छगुबाई गोपीचंद माळी (वय-७२) अशी या वृद्ध दाम्पत्याची नावे आहेत.
हेही वाचा -VIDEO : 'ईटीव्ही भारत' कोरोना विशेष बुलेटिन..
मागील काही दिवसांपासून छगुबाई या आजारी असल्याने त्यांच्यावर उमरगा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान छगुबाई यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यात त्यांचे निधन झाले. छगुबाई यांच्या निधनामुळे गोपीचंद माळी अस्वस्थ झाले. छगुबाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर गोपीचंद माळी यांनाही हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.