उस्मानाबाद -जगभरात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे. या आजाराचा बिमोड करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व जण कामाला लागले आहेत. मात्र, महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर प्रशासन या आजाराचा फैलाव होऊ नये, याचा बंदोबस्त करण्यासाठी उदासीन असल्याचा प्रकार समोर येत आहे. तुळजाभवानी मंदिरात प्रत्येक दोन 2 तासानंतर स्वच्छता करण्याचे आदेश देऊन मंदिर प्रशासन निवांत झाले आहे. मंदिर परिसरात आजाराच्या जनजागृतीसाठीचे माहिती फलक देखील लावलेले नाही आहेत. जे मास्क घालायचे आहेत ते देखील कुठल्याही कर्मचाऱ्याला दिले नाहीत. याठिकाणी कुठलीही वैद्यकीय सुविधा उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हेही वाचा -उस्मानाबादेत द्राक्षबागा उध्वस्त करणारी टोळी सक्रिय; शेतकरी चिंतेत