महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये जोरदार पावसाची हजेरी; शेतकरी सुखावला - उस्मानाबाद पाऊस न्यूज

उस्मानाबाद जिल्ह्यात काही भागात आज जोरदार पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांनी शेतातील मशागतीची कामे पूर्ण केली असून शेतकरी पेरणीसाठी पावसाचीच वाट पाहत होता. त्यामुळे आज मेघगर्जनेसह पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा काही प्रमाणत फायदा होणार आहे.

Rain
पाऊस

By

Published : Jun 10, 2020, 8:47 PM IST

उस्मानाबाद -जिल्ह्यातील काही भागात आज जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून उष्णतेची लाट ओसरून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी शेतातील मशागतीची कामे पूर्ण केली असून शेतकरी पेरणीसाठी पावसाचीच वाट पाहत होता.

उस्मानाबादमध्ये जोरदार पावसाची हजेरी

रब्बी हंगाम संपण्याच्या दरम्यान राज्यात कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. त्यामळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून सावरत शेतकऱ्याने खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी केली आहे. त्यामुळे आज मेघगर्जनेसह पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांना काही प्रमाणत फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details