उस्मानाबाद - येथील ढोकी पोलीस ठाण्याच्या २ पोलीस निरीक्षकांना एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदार यांच्या पत्नीने ढोकी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
चार सुवर्णपदके पटकावणारा पोलीस निघाला लाचखोर - उस्मानाबाद
गैरअर्जदार यांच्यावर कडक प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी ढोकी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत जाधव आणि ज्योतीराम कवठे यांनी ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
गैरअर्जदार यांच्यावर कडक प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी ढोकी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत जाधव आणि ज्योतीराम कवठे यांनी ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यापैकी २० हजार रुपये लाच स्वीकारताना ढोकी पोलीस ठाण्याच्या २ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना एसीबीच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत जाधव याला उत्कृष्ट कर्मचारी तसेच आयओ पोलीस फोटोग्राफी लिफिटिंग,पॅकिंग अँड फॉरवर्डींग,फॉरेन्सिक सायन्स अँड मेडिसिन व फिंगर प्रिंट या विभागात ४ सुवर्णपदक तर गुन्हे तपासासाठी एक रौप्य अशा पदकांनी गौरविण्यात आलेले आहे.