उस्मानाबाद -तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीची धाकटी बहिण समजल्या जाणाऱ्या आणि महाराष्ट्रात येडाई या नावाने प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेतील चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम विधीवत पार पडला. 'आई राजा उदो उदो'च्या जयघोष करत, हलगी व संबळाच्या गजरात यात्रेला सुरवात झाली. चैत्र पोर्णिमेनिमित्त भरलेल्या या यात्रोत्सवात तापलेल्या उन्हात लाखो भाविकांनी येरमाळा नगरीत चुनखडी वेचण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली.
उस्मानाबाद : तुळजाभवानीची बहिण समजल्या जाणाऱ्या येडेश्वरीची यात्रा मोठ्या उत्सवात संपन्न - celebrat
महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी यात्रा म्हणून येडेश्वरी देवस्थान प्रसिद्ध आहे. येथील येडेश्वरी देवीचा यात्रोत्सव दरवर्षी चैत्र पोर्णिमेच्या दरम्यान संपन्न होतो. यावर्षीच्या यात्रेतील मुख्य असा चुना वेचण्याचा कार्यक्रम शनिवारी होता. यानिमित्त शुक्रवार पासुनच येरमाळा येथे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातूनही देवीचे भक्तगण येरमाळा येथे आले होते.
महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी यात्रा म्हणून येडेश्वरी देवस्थान प्रसिद्ध आहे. येथील येडेश्वरी देवीचा यात्रोत्सव दरवर्षी चैत्र पोर्णिमेच्या दरम्यान संपन्न होतो. यावर्षीच्या यात्रेतील मुख्य असा चुना वेचण्याचा कार्यक्रम शनिवारी होता. यानिमित्त शुक्रवार पासुनच येरमाळा येथे महाराष्ट्रातील कानाकोपर्यातून तसेच परराज्यातूनही देवीचे भक्तगण येरमाळा येथे आले होते. आजच्या दिवशी येडाईच्या डोंगरावरील येडेश्वरी मंदिर ते राष्ट्रीय महामार्गालगतच्या आमराई दरम्यान पालखी मिरवणूक निघाली. यावेळी 'आई राजा उदो उदो'चा जयघोष करण्यात आला. संभळ, झांज आणि हलगीच्या तालावर ठेका धरत भाविक तल्लीन होवून पालकीच्यासमोर थिरकले. त्यानंतर चुना वेचण्यासाठी लाखोंचा संख्येने गर्दी झाली. येडेश्वरी देवीच्या चैत्री यात्रामहोत्सवात चुना वेचण्याचा कार्यक्रमास मोठे अधिष्टान आहे. गावातून हलगी, पखवाज, डोलकी, संभळाच्या वाद्यासह निघालेली पालखी लाखों भक्तांच्या सोबतीने चुण्याच्या रानात पोहचली.
याठिकाणी जवळपास दहा लाखांच्या आसपास येडश्वरी देवीचे भक्त होते. जमलेल्या प्रत्येक भाविकांनी मानाचे पाच खडे वेचुन पालखीच्या दिशेने टाकले. याशिवाय सोबत आणलेले नैवेद्य आई येडेश्वरीस अर्पन केला.यावेळी जवळपास तीन किलोमिटर अंतराच्या परिसरात बघावे तिकडे भक्तांची गर्दी दिसून येत होती. या पुढीचे सहा दिवस आई येडेश्वरीचा आमराईतील याच ठिकाणी मुक्काम असतो. सकाळी साडेदहाच्या सुमारास पालखीचे गावात आगमन झाले. यानिमित्त पालखी मार्गावर सड्याची शिपंन करून नयनरम्य रांगोळी काढून फुलांचे अंथरन केली होती. दरवर्षी प्रमाणे व तुळजापूरच्या तुळजाभवानी प्रमाणेच या सोहळ्यास राज्यासह बाहेर राज्यातील भविक येरमळा येथे दाखल होतात.