उस्मानाबाद - डॉ बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar ) यांच्या पदस्पर्श लागलेल्या कसबे तडवळे येथील कळंब रोडला रेल्वे थांबा देण्यासाठी अन्यथा अन्नत्याग ( Food Abstinence Movemen ) आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. रेल्वे प्रशासनाची अनास्था असल्याने गावातील ग्रामस्थांकडून रेल्वे प्रशासनाच्या विरोधात अन्नत्याग ( Food boycott movement against railway administration ) आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश शेतकरी शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष कोंडप्पा कोरे यांनी दिली. ते कळंब रोड स्टेशन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
मनमानी कारभार -23 फेब्रुवारी 1941 ला मराठवाड्यातील पहिली महार, मांग वतन परिषद कसबे तडवळे या गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतली होती. त्यावेळी नॅरोगेज रेल्वेने आंबेडकर या ठिकाणी पोहचले होते. पुढे या नॅरोगेजचे ब्रॅडगेज करण्यात आले. तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी नॅरोगेज रेल्वेला जे थांबे होते तेच थांबे ब्रॉडगेज रेल्वेला कायमस्वरूपी ठेवावेत असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. मात्र, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करीत या रेल्वेस्थानकाला त्यातून कशासाठी वगळले आहे? असा सवाल कोरे यांनी उपस्थित केलाय.