महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाई मला दादाच्या वर्गात जायचंय, अन्वीचं रडगाणं भन्नाट व्हायरल - washi tahsil

उस्मानाबाद जिल्हयातल्या वाशी तालुक्यातील मांडवा गावात बालाजी वसंतराव तावरे यांची मुलगी अन्वी. या चिमुरडीच्या शाळेचा पहिला दिवस आणि तीने तिच्या दादाच्या वर्गात बसण्याचा लावलेला तगादा सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे.

अन्वी तावरे

By

Published : Jul 27, 2019, 8:36 AM IST

उस्मानाबाद -अन्वी तावरे या चिमुरडीचा भन्नाट व्हिडिओ सध्या राज्यभर व्हायरल होतो आहे. अन्वीच्या शाळेचा पहिला दिवस अन बाईंसोबतच रडगाणं प्रत्येकालाच या व्हिडिओच्या मोहात पाडते आहे.

अन्वीचं भन्नाट व्हायरल झालेल रडगाणं
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यातील मांडवा गावात बालाजी वसंतराव तावरे यांची मुलगी अन्वी. या चिमुरडीच्या शाळेचा पहिला दिवस आणि तिने तिच्या दादाच्या वर्गात बसण्याचा लावलेला तगादा सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. अन्वीचा हट्ट, बोलण्यातील निरागसता, विषयांतर ऐकूण बाईसुद्धा थक्क झाल्या. त्यांनी याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि कौतुक म्हणून हा व्हिडिओ पोस्ट देखील केला. तो आता राज्यभर व्हायरल होतो आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details