उस्मानाबाद : जिल्ह्यात एका वासनांध भोंदू महाराजाने भक्तावर बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यामुळे, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर भोंदू महाराज पळून जात असतांना इटकळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दिगंबर नामदेव गिरी असे या भोंदू महाराजाचे नाव आहे.
घृणास्पद! उस्मानाबादेत वासनांध महाराजाचा भक्तावर अनैसर्गिक अत्याचार - भोंदु महाराज बलात्कार प्रकरण उस्मानाबाद बातमी
उस्मानाबादेत एका भोंदू महाराजाने भक्तावर बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर भोंदू महाराज पळून जात असताना इटकळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दिगंबर नामदेव गिरी असे या वासनांध भोंदू महाराजाचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, मौजे इटकळ येथे तीन महिन्यापूर्वी एक फिरस्ता महाराज आला व गावापासून जवळच असलेल्या महादेव मंदिरात आश्रयास थांबला. अंगात भगवे वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा व डोक्यावर भल्या मोठ्या जटा असा पेहराव असलेल्या या महाराजाची सेवा करण्यासाठी आणदूर येथील एक व्यक्ती आली. त्यानंतर रात्री या भोंदू महाराजाने सदर व्यक्तीस अंगाला तेल लाऊन मालिश करण्यास सांगितले. आज्ञेचे पालन करत सदर व्यक्तीने सेवाभावाने महाराजाचे अंग मालिश करण्यास सुरुवात केली. दरम्यान, विकृत मनोवृत्ती असलेल्या या वासनांध महाराजाने भक्तावरच बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार केला. या प्रकरणी पीडितने नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही वार्ता पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली असून सदर भोंदू महाराज पळून जात असतांना इटकळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
TAGGED:
fraud baba osmanabad news