महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 3, 2019, 7:42 AM IST

ETV Bharat / state

उस्मानाबादेत पाच दिवसापासून पावसाची रिपरिप सुरुच; शेतकऱ्यांना दिलासा

गेल्या पाच दिवसापासून संपूर्ण जिल्हाभर वरुणराजा चांगला बरसत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण, अधूनमधून पडणाऱ्या रिमझिम सरी तर एकदमच धो-धो पडणारा पाऊस, यामुळे नागरिक सुखावले आहे.

शेतकऱ्यांना दिलासा

उस्मानाबाद- दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हाभर वरुणराजा चांगला बरसत आहे. ढगाळ वातावरण असल्याने गेल्या पाच दिवसापासून उस्मानाबादकरांना सूर्यदर्शनही मिळालेले नाही. दिवसभर ढगाळ वातावरण, अधूनमधून पडणाऱ्या रिमझिम सरी तर एकदमच धो-धो पडणारा पाऊस, यामुळे नागरिक सुखावले आहे.

उस्मानाबाद शहराने पाणीटंचाईची झळ सोसली आहे. त्यामुळे पाऊस पडावा यासाठी सर्वांनीच वरुण राजाकडे हात जोडले. मात्र पावसाळ्याचे दोन महिने संपले तरीही जिल्ह्यात पाऊस पडत नव्हता. परिणामी जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या. आतापर्यंत 200 पेक्षा अधिक टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र गेल्या पाच दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे तात्पुरता का होईना पाणीटंचाईचा प्रश्‍न मिटेल, अशी अशा लागली आहे. शिवाय पिकांना काही प्रमाणात आधार मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details