उस्मानाबाद - चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूची धास्ती भारतीयांनीही घेतली आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण महाराष्ट्रातही आढळून आले आहेत. एक संशयित रुग्ण उस्मानाबादेतील जिल्हा रुग्णालयामध्ये आढळल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवली जात असून त्यामुळे उस्मानाबादमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोरोना विषाणूचे रुग्ण भारतातही आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, समाजमाध्यमांद्वारे पसरविण्यात येणाऱ्या अफवांमुळे नागरिकांच्या भीतीत आणखी भर पडत आहे. अशातच कोरोनाचा संशयित रुग्ण आढळून आल्याच्या अफवा उस्मानाबमध्येही पसरल्या. या अफवांमुळेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी शहर पोलीस ठाणे गाठून कोरोनाची अफवा पसरवणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात रितसर तक्रार दिली आहे.