महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुळजाभवानीच्या मौल्यवान दागिन्यांच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - तुळजापूर दागिणे अपहार प्रकरण

तुळजाभवानीच्या मौल्यवान दागिने गायब प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आहे. तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील अनेक मौल्यवान, अतिप्राचीन दागिने,चांदीच्या वस्तू, पुरातन नाणी असा दागिन्यांचा ऐवज गायब झाला आहे.

तुळजा भवानी
तुळजा भवानी

By

Published : Sep 14, 2020, 10:46 AM IST

उस्मानाबाद- राज्याची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मंदिरात दागिन्यांचा अपहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश देताच मंदिरातील ऐतिहासिक नाणी व अलंकार अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिर संस्थांच्या तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील अनेक मौल्यवान, अतिप्राचीन दागिने,चांदीच्या वस्तू, पुरातन नाणी असा दागिन्यांचा ऐवज गायब झाला आहे. या प्रकरणी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणाची अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी केली असता, तत्कालीन मंदिरचे धार्मिक सहव्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणी लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत होती.

तुळजाभवानी मंदिर व्यवस्थापक तथा तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या तक्रारीवरून तत्कालीन धार्मिक सह व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्या विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम ४२०,४०९,४६४,४६७,४६८,४७१,३८१,भा.द.वि. नुसार दाखल करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details