उस्मानाबाद - जिल्ह्यातील संत गोरोबाकाका यांच्या नगरीत म्हणजेच तेर येथे दोन गटांत अभ्यासिकेच्या जागेवरून प्रचंड हाणामारी झाली. आज ( दि. 21 ) सकाळी अभ्यासिकेचे सामान स्थलांतरित करण्यावरून सुरुवातीला शाब्दीक राडा झाला. त्यानंतर त्याचे हाणामारीत रुपांतर झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तेर येथे जिल्हा नियोजन व विकास समितीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी 5 लाख रुपये खर्च करुन जुन्या ग्रामपंचायत कार्यालयातील एका हॉलमध्ये अभ्यासिका उभारण्यात आली होती. नंतरच्या काळात मासिक सभेत ही अभ्यासिका नरसिंह वेस चावडीत स्थलांतरीत करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायतीचा हॉल हा उमेदच्या महिलांना देऊन शनिवारी (दि. 18 ) या अभ्यासिकेतील साहित्य नवीन ग्राम पंचायतीच्या जागेवर स्थलांतरित करण्यात आले होते.