उस्मानाबाद -उमरगा तालुक्यातील कडदोरा या गावात विजेच्या धक्क्याने वडील आणि मुलाचा मृत्यू झाला. काशिनाथ रणखांब आणि अमोल रणखांब अशी या दोघांची नावे आहेत. दोघांचाही एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आला.
विजेच्या धक्क्याने बापलेकाचा मृत्यू; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार - उमरगा वडिल-मुलगा मृत्यू
कडदोरा या गावात विजेच्या धक्क्याने वडिल व मुलाचा मृत्यू झाला. काशिनाथ रणखांब आणि अमोल रणखांब अशी या दोघांची नावे आहेत. शेतात वीज वायर लावताना ही दुर्घटना झाली.
काशिनाथ रणखांब यांची कडदोरा गावात १२ एकर शेती आहे. त्यांच्या शेतात बोअरवेल आणि विहीर आहे. याठिकाणी वीज जोडणी करण्यासाठी त्यांनी महावितरणकडे डिपॉजिट भरले होते. त्यासाठी शेतात विजेचे खांब उभे करण्यात आले आहेत. मात्र, अद्याप तारा ओढल्या गेल्या नाहीत. त्यामुळे रणखांब यांनी पीक वाया जात असल्याचे पाहून चारशे ते पाचशे फुट वायर अंथरून दूरच्या खांबावरून वीज घेतली होती.
वीज बंद असल्याचे पाहून काशिनाथ रणखांब हे त्यांच्या दोन मुलांना आणि संतोष विनायक रणखांब यांना सोबत घेऊन लाकडे रोवून वायर नेत होते. हे काम सुरू असतानाच ११ केव्हीए विजेच्या लाईनला वायरसोबत असलेल्या तारेचा स्पर्श झाला. यात काशिनाथ रणखांब आणि अमोल रणखांब यांचा जागीच मृत्यू झाला तर, सचिन विनायक रणखांब हे जखमी झाले.