महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो - फादर फ्रान्सिस दिब्रिटो

उस्मानाबाद येथे 10,11 आणि 12 जानेवारी 2020 रोजी 93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो

By

Published : Sep 22, 2019, 11:56 PM IST

उस्मानाबाद -ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उस्मानाबाद येथे 10,11 आणि 12 जानेवारी 2020 ला हे संमेलन होणार आहे.

महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ढाले-पाटील संमेलनाच्या अध्यक्षाबाबत माहिती देताना

हेही वाचा -शेतकरीवर्गाला बळ देण्यासाठी साहित्यिकांनी प्राधान्याने लेखन करावे - अमर हबीब

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या उस्मानाबाद येथील बैठकीनंतर साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ढाले-पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी महामंडळाचे कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष रामचंद्र काळुंखे, स्वागताध्यक्ष नितीन तावडे, प्रमुख कार्यवाह रवींद्र केसकर आणि कोषाध्यक्ष माधव इंगळे उपस्थित होते.

जानेवारी 2020 मधील होणाऱ्या संमेलनात येणार्‍या ग्रंथविक्रेत्यांसाठी 350 सुसज्ज गाळे तयार करण्यात येणार आहेत. प्रतिगाळा 6,500 रुपये शुल्क आकारण्यात येणार असून ग्रंथविक्रेत्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. संमेलनासाठी राज्य आणि देशभरातून येणार्‍या प्रतिनिधींसाठी 3 दिवसाचे भोजन, निवास आणि साहित्य संमेलनाचे किट उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी 3000 रूपये शुल्क निर्धारित करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details