महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने वडिलांची आत्महत्या - osmanabad suicide news

सुरेश लंगडे हे सोसायटीचे चेअरमन असून त्यांनी बदनामीच्या भीतीपोटी  शेतात गळफास घेवून आपले जीवन संपविले. या घटनेमुळे अणदूर गावात तणावाचे वातावरण पसरले आहे.

मृत सुरेश लंगडे

By

Published : Sep 22, 2019, 10:22 PM IST

उस्मानाबाद - मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अणदूर येथे घडली आहे. सुरेश लंगडे असे आरोपी मुलाच्या वडिलांचे नाव आहे.

मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने वडिलांची आत्महत्या

शिक्षक असलेल्या मुलाने गावातील एका अल्पवयीन मुलीला लॉजवर नेवून अत्याचार केल्याप्रकरणी नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याने निराश होऊन वडिलांनी आत्महत्या केली आहे. सुरेश लंगडे हे सोसायटीचे चेअरमन असून त्यांनी बदनामीच्या भीतीपोटी शेतात गळफास घेवून आपले जीवन संपविले. या घटनेमुळे अणदूर गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

हे ही वाचा -संतापजनक! आदिवासी विवाहितेची सामूहिक बलात्कार करून हत्या

अणदूर येथील सुरेश लंगडे (वय ५२) यांचा मुलगा सुशांत लंगडे खासगी संस्थेत शिक्षक आहे. सुशांत याने गावातीलच एका अल्पवयीन मुलीला तुळजापूरच्या लॉजवर नेवून अत्याचार केल्याचा गुन्हा शनिवारी रात्री नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला. गुन्हा दाखल होताच सुरेश लंगडे यांनी बदनामीच्या भीतीपोटी रविवारी पहाटे शेतात जावून गळफास घेऊन आत्महत्या केली.
हे ही वाचा -भिवंडीत विवाहितेवर दिरासह ४ जणांचा बलात्कार; नराधम अटकेत

ABOUT THE AUTHOR

...view details