उस्मानाबाद- जिल्ह्यात चालू वर्षी अल्प पाऊस झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. जनावरांच्या चारा-पाण्यासह पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण झाली आहे. राज्य शासनाने गेल्या महिन्यात तांदूळवाडी दहिफळ, पानगाव, सोनारवाडी, उमरा, येरमाळा सह जिल्ह्यातील अन्य गावात चारा छावण्या सुरु केल्या होत्या. मात्र, पावसाळ्याच्या सुरुवातीला थोडा पाऊस झाल्याने प्रशासनाने चारा छावण्या बंद केल्या आहेत.
उस्मानाबाद : चारा छावण्यांच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - जिल्हाधिकारी कार्यालय
पावसाळा सुरु होवून आता अडीच महिन्यापेक्षा जास्तीचा काळ उलटून गेला. पण अल्प पावसाने पिके कोमेजून गेली. तर जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. जवळपास २५ गावच्या दोन हजार शेतकऱ्यांनी जनावरासह जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढला.
पावसाळा सुरु होवून आता अडीच महिन्यापेक्षा जास्तीचा काळ उलटून गेला. पण अल्प पावसाने पिके कोमेजून गेली. तर जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. जवळपास २५ गावच्या दोन हजार शेतकऱ्यांनी जनावरासह जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढला. हा मोर्चा अचानक निघाल्याने प्रशासनासह पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. शेतकरी व जनावरांना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच अडवण्यात आले. यावेळी शेतकरी व पोलिसांची बाचाबाची झाली. १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चारा छावण्या ३१ ऑगस्ट पर्यंत चालू ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण चारा छावण्या बंद केल्याने पशूपालकांच्या समोर मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. चारा छावण्याची तातडीने मंजुरी देण्याची मागणी पशूपालक करत आहेत.