उस्मानाबाद- जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाने आणि अवकाळी पावसाने त्रस्त झाला आहे. यातच अपसिंगा या गावातील बब्रुवान राऊत या 70 वर्षीय शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेचे अज्ञाताने नुकसान केले आहे. राऊत यांच्या शेतात द्राक्ष बागेच्या जवळपास 2 हजार 100 वेली ( द्राक्ष झाड) आहेत. यापैकी 1 हजार 400 द्राक्षांच्या वेली रात्रीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने कापून टाकल्या आहेत. यामुळे राऊत यांचे 14 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाले असून या घटनेने अपसिंगा परिसरात अज्ञात व्यक्तीची दहशत निर्माण झाली आहे.
विकृतीचा कळस : द्राक्ष बाग तोडून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान
उस्मानाबादमधील अपसिंगा गावातील 70 वर्षीय शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेतील चौदाशे द्राक्ष वेली अज्ञाताने रात्रीतून तोडल्याने सुमारे 14 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त शेतकरी
द्राक्ष बागेची लागवड केल्यानंतर याला प्रचंड कष्ट घेऊन वाढवावे लागते. राऊत यांच्या बागेतील ज्या वेलीवर द्राक्ष घड लागलेले आहेत, नेमक्या त्याच वेली या अज्ञाताने तोडून टाकल्या आहेत. त्यांच्या पत्नी विमल यांना बागेकडे पाहून अश्रू आवरता आले नाहीत. हातच्या फोडाप्रमाणे जोपासलेली द्राक्षबाग एका रात्रीत होत्याची नव्हती झाली. अज्ञाताचा शोध सुरू असून अद्याप कारवाई झाली नाही.
हेही वाचा - डॉक्टरांनी नाकातून काढले दोन हिरवे वाटाणे