महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रहारचा आसूड; उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी दिला ठिय्या

पवनऊर्जा प्रकल्पासाठी खाजगी कंपनीने खरेदी केलेल्या जमिनींचा योग्य मोबदला न मिळाल्याने उस्मानाबादमधील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीने चाबकाचे फटकारे वाजवले गेले.

By

Published : Aug 14, 2019, 9:32 PM IST

चाबकाचे फटके वाजवत उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

उस्मानाबाद - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर कार्यालयासमोरच चाबकाचे फटकारे वाजवले.

चाबकाचे फटके वाजवत उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
उस्मानाबाद आणि तुळजापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी पवनऊर्जा प्रकल्पासाठी खासगी कंपनीने खरेदी केल्या आहेत. याचा योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी हे ठिय्या आंदोलन केले. 29 जुलै रोजी या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवस आमरण उपोषण केले होते. त्यावर त्यांना जमिन अधिग्रहणासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे तोंडी आश्वासन उपजिल्हाधिकारी चेतन गिरासे यांनी दिले होते. त्यानंतर अद्याप कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत, जोरदार घोषणाबाजी केली. 'देत कसे नाय? घेतल्याशिवाय राहात नाय' अशी जोरदार घोषणाबाजी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details