उस्मानाबाद- शुक्रवारी रात्री मोर्डा येथील चोरीचा आरोप झाल्याने एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यातील 2 पोलिसांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रंगराव अंबादास पाटील-कोळेकर (53) असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाटील-कोळेकर यांना गेल्या 2 ते 3 महिन्यांपूर्वी एक शेळी सापडली होती. ही शेळी एक महिन्यापूर्वी मुळ मालकाचा तपास लागल्यावर कोळेकर यांनी परतही दिली होती. मात्र, शेळी चोरी गेली अथवा हरवली या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाणे येथे कोणाचीही तक्रार अथवा गुन्हा दाखल नसताना, तुळजापूर पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल गौतम शिंदे व राठोड यांनी रंगराव पाटील-कोळेकर यांना तुम्ही शेळीची चोरी केली आहे. या प्रकरणी तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगत धमकावत होते.
हेही वाचा -बाळासाहेब थोरातांना मंदी कळते का मंदी..?