महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

द्राक्ष बाग वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न - saving grapes corp

वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे द्राक्ष पिकावर परिणाम होत आहे. नाशिकची द्राक्षे ही विदेशात निर्यात केली जातात. त्यामुळे द्राक्षाचे पीक वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत.

nashik
द्राक्ष बाग वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न

By

Published : Feb 5, 2020, 10:19 AM IST

नाशिक - दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष बांगलादेशात निर्यात होतात. असे असले तरी जानेवारीच्या शेवटच्या आठवडयात आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात थंडीत वाढ झाली आहे. तालुक्यातील थंडीचे प्रमाण 12.1 अंश सेल्शियस आहे. परंतु दिवसा उन्हाचे चटके बसत आहेत. उन्हापासून सुगर उतरलेल्या द्राक्षांना सनभर येवून निर्यातक्षम द्राक्षांना शेतकरी पेपराचे अच्छादन द्राक्षांना लावून आपली द्राक्षे बाहेरच्या देशात कशी निर्यात करता येतील यासाठी प्रयत्न करत आहेत.

द्राक्ष बाग वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न

हेही वाचा -...म्हणून मालेगावकरांची 'बत्ती गुल'

वातावरणात होणऱ्या बदलांमुळे निर्यात योग्य द्राक्षांवर याचा परिणाम होताना दिसत आहे. द्राक्षांना वाचविण्यासाठी द्राक्षाचे फळ पेपरच्या रद्दीमध्ये गुंडाळले जात आहे. यासाठी 13 रुपये प्रमाणे एकरी चार क्विटल रद्दी लागत आहे. त्यासाठी मजुरीचा 10 ते 12 हजार रुपये खर्च होत असून एकरी 18 ते 20 हजार रुपये खर्च येतो. कागद लावल्यामुळे द्राक्षाचा आकार वाढतो आणि द्राक्षाच्या घडाचा दुधी रंग टिकून राहतो. निर्यातक्षम द्राक्षात 70 ते 80 मणी एका घडात असावे लागतात. द्राक्षाचा आकार 15 मिलीमिटर ते 18 मिलीमिटर पाहिजे. तसेच, द्राक्षाचे गोळी 15 ते 16 ब्रिक्स पाहिजे.

ABOUT THE AUTHOR

...view details