उस्मानाबाद - भूम तालुक्यातील मात्रेवाडी गावातील एका शेतकऱ्याने खासगी सावकाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हनुमंत पवार असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याने सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. यातील काही पैशांची परतफेड केली होती. मात्र, उर्वरित दीड लाख रुपये परत न केल्याने त्याला सावकाराने मारहाण केली होती.
सावकारी पाश...! त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - osmanabad farmer suicide
भूम तालुक्यातील मात्रेवाडी गावातील एका शेतकऱ्याने सावकाराला कंटाळून गळफास घेतला आहे. हनुमंत पवार असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याने एका सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते.

मारहाण आणि बदनामी यामुळे हनुमंत पवार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी भूम पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असून ते फरार आहेत.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकर्यांना कर्ज मुक्त करण्यासाठी घोषणा करण्यात आली. त्याच अनुषंगाने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्यास सुरुवात केली आहे. मात्र काही शेतकऱ्यांवरती खासगी सावकारकीचा असलेला कर्जाचा फास अद्यापही सुटलेला नाही. यातूनच संबंधित प्रकार समोर आला आहे.