महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबाद : शिवसेनेचे उमेदवार राजेनिंबाळकरांनी आर्थिक फसवणूक केली, चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या - commit

ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि विजय दंडनाईक यांनी फसवणुक करून ४ एकर जमिनीचे शेताचे गहाणखत केले. याला कंटाळून मी आत्महत्या करत आहे, असे चिठ्ठीत लिहून शेतकरी दिलीप ढवळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

दिलीप ढवळे

By

Published : Apr 13, 2019, 5:11 PM IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केली. यामुळे आपण आर्थिक अडचणीत आलो होतो. मानसिक त्रास सहन न झाल्याने आपण आत्महत्या करत आहोत, असे एका शेतकऱ्याने चिठ्ठीमध्ये लिहून आत्महत्या केली. दिलीप ढवळे, असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

उस्मानाबाद : आर्थिक फसवणूक झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

मागील १० वर्ष दुष्काळामुळे शेती पिकली नाही. ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि विजय दंडनाईक यांनी फसवणुक करून ४ एकर जमिनीचे शेताचे गहाणखत केले. याला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. मला फसवलेले सर्व पुरावे घरात असलेल्या कपाटातील पिशवीत आहेत, असे चिठ्ठीत लिहून शेतकरी दिलीप ढवळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ढोकी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाच्या नावे लिहिलेली चिठ्ठी आणि मतदारांना आवाहन करणारे एक पत्र दिलीप ढवळे यांच्या खिशातून मिळाले. यात शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि वसंतदादा बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक यांनी फसवणुक केल्यामुळेच आपल्यावर ही वेळ आली. या दोघांनी ४ एकर जमिनीवर बोजा चढविण्यास भाग पाडले. आपल्या नावे घेतलेल्या कर्जाची सर्व रक्कम तेरणा कारखान्यासाठी वापरण्यात आली. हमी देऊनही परतफेड न केल्यामुळे जमिनीचा ३ वेळा लिलाव पुकारला गेला. त्यातून गावात बदनामी झाली. यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे.

या चिठ्ठीव्यतिरिक्त मतदारांना केलेले २ पानी आवाहन पत्रदेखील त्यांच्या खिशात सापडले आहे. यात तेरणा कारखाना सुरू करण्यासाठी ७२ शेतकऱ्यांच्या नावे प्रत्येकी ३ लाख रुपयांचे कर्ज काढण्यात आले. या कर्जाची परतफेड करण्याची हमी कारखान्याच्या संचालक मंडळाने शपथपत्राद्वारे बँकेकडे दिली. मात्र कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे ७२ लोकांच्या जमीन आणि वाहनांच्या लिलावाची कारवाई करण्यात आली. काही जणांच्या जमिनी लिलाव करून विक्रीदेखील करण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details