महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'अकस्मात मृत्यू नाही तर माझ्या मुलाचा खून'.. मुरूम येथे भर पावसात कुटुंबाचे उपोषण

२३ मार्चला सुनिता सुरेश कांबळे यांचा मुलगा बालाजी याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मात्र, पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात होती. या प्रकरणाचा तपास करून खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबियांनी केली आहे.

osmanabad crime news
'अकस्मात नाही तर माझ्या मुलाचा खून'.. मुरूम येथे भर पावसात कुटुंबाचे उपोषण

By

Published : Jun 18, 2020, 1:33 PM IST

Updated : Jun 18, 2020, 1:42 PM IST

उस्मानाबाद - उमरगा तालुक्यातील मुरूम येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झालेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करून खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी उमरगा येथील मृताच्या कुटुंबीयांना उमरगा तहसील कार्यालय आवारात भर पावसात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

२३ मार्चला सुनिता सुरेश कांबळे यांचा मुलगा बालाजी याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मात्र, पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात होती. या प्रकरणाचा तपास करून खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबियांनी केली आहे. संबंधित प्रकरणी साक्षीदाराची माहिती वारंवार मुरूम पोलीस ठाण्यात दिली आहे. मात्र, अद्याप खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही', असे निवेदनात म्हटले आहे. माझा मुलगा बालाजी यास पोहता येत होते. त्याच बरोबर अंगावर, हनुवटी जवळ मारहाण झल्याच्या जखमा दिसत होते. त्याच बरोबर गुन्हेगारांनी तडजोडीबाबत केलेल्या प्रयत्नांचे संभाषण रेकॉर्डिंग आहे. त्यामुळे गुन्हेगारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मयत बालाजी कांबळे यांच्या कुटुंबांनी केली आहे.

Last Updated : Jun 18, 2020, 1:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details