उस्मानाबाद- एसटी महामंडळाने बोगस ज्येष्ठ नागरिकांमुळे एसटीवर पडणारा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी स्मार्ट कार्ड वाटपाचे काम हाती घेतले होते. हे काम महामंडळाने एका खासगी कंपनीला दिले आहे. मात्र, या खासगी कंपनीकडून नागरिकंची लूट सुरू होती. या संदर्भात ईटीव्ही भारतने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर तत्काळ या लुटीच्या प्रकाराला आळा बसला आहे.
ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठ नागरिकांची होणारी लूट थांबली - ST smart card
स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी खासगी कंपनीकडून ७० रुपये दर आकारने अपेक्षित आहे. मात्र, ग्राहकांकडून या कामी २०० रुपये घेण्यात येत होते. या लुटीची बातमी ईटीव्ही भारतने ५ जुलैला प्रसिद्ध केली होती.
एसटी महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिकाना स्मार्ट कार्ड देण्यात येत आहेत. त्याच्या नोंदणीसाठी ५५ रुपये खर्च येतो. मात्र, महामंडळाने हे काम एका खासगी कंपनीला दिले आहे. नोंदणीसाठी खासगी कंपनीकडून ७० रुपये दर आकारने अपेक्षित आहे. मात्र,नागरिकांकडून या कामी २०० रुपये घेण्यात येत होते. या लुटीची बातमी ईटीव्ही भारतने ५ जुलैला प्रसिद्ध केली होती. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी बातमीची दखल घेत महामंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटून आंदोलनाचा इशारा दिला होता.
आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर तत्काळ ग्राहाकंची लुट थांबवण्यात आली. ईटीव्ही भारतने महामंडळ अधिकारी आणि ऑनलाइन सेंटर चालकांमध्ये लागेबांधे असल्याचा संशय व्यक्त केला होता. याप्रकरणी महामंडळातील अधिकाऱ्यांनाही विचारण्यात आले असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला.