उस्मानाबाद - जिल्ह्यात अजूनही हवा तसा पाऊस झाला नाही. वरूणाजा प्रसन्न व्हावा आणि चांगला पाऊस पडावा यासाठी लोहगावातील गावकऱ्यांनी चक्क गाढवाची मिरवणूक काढली.
उस्मानाबादेतील लोहगावमध्ये वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी गाढवाची मिरवणूक - kailas chaudhari
वरूणाजा प्रसन्न व्हावा आणि चांगला पाऊस पडावा यासाठी तुळजापूर जिल्ह्याच्या लोहगावातील गावकऱ्यांनी चक्क गाढवाची मिरवणूक काढली.
दिवसभर जिल्ह्याभरात ढगाळ वातावरण असते त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्याच नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. मात्र, अजूनही पावसाने दुर्लक्ष केले आहे. मृग नक्षत्र संपले आहे तरीही पाऊस आला नाही. यामुळे तुळजापूर तालुक्यातील लोहगाव या गावातील लोकांनी वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी संपूर्ण गाव भर चक्क गाढवाची मिरवणूक काढली. इडा पिढा जावू दे बळीराजाचे राज्य येवू दे, हर..हर..महादेव, वरूणराज्या की जय..! अशा घोषणा करत देवाचा जयजयकार केला. गुलाल उधळत, गाजावाजा करत गावभर मिरवणूक काढण्यात आली. तसेच गावातील देवी देवतांना पाणी घालून पूजा करून पावसासाठी साकडे घालण्यात आले. या मिरवणुकीमध्ये ग्रामस्त शेतकरी मोठ्या संख्याने सहभाग घेतला.