उस्मानाबाद- बाळासाहेब ठाकरे योजनेतील पैसा हा मातोश्रीवर जातो असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी अमरावती येथील पर्दाफाश यात्रेदरम्यान केला होता. नाना पटोले यांच्या आरोपाला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी उस्मानाबाद येथे प्रतिउत्तर दिले आहे.
अमरावती येथे पर्दाफाश यात्रेदरम्यान नाना पटोले यांनी बसच्या तिकिटावर विम्यासाठी एक रुपयांचा अधिभार लावला जातो. यातून दररोज 67 लाख रुपये जमा होतात. मात्र या अधिभाराची रक्कम ही मातोश्रीवर जाते असा आरोप पटोले यांनी उद्धव ठाकरे यांच्या वरती केला होता. रावते यांनी या टीकेला प्रत्युत्तर देताना कुठलीही माहिती न घेता बोलणारा माणूस बेशरम आहे. अशा मूर्खांना जनता आमदार खासदार म्हणून कसे निवडून देतात हा प्रश्न मला पडतो. पर्दाफाश यात्रा म्हणजे कपडे काढून उघडे-नागडे होणे अशी ही यात्रा आहे. असे म्हणत काँग्रेसच्या सुरू असलेल्या पर्दापाश यात्रेवर ती दिवाकर रावते यांनी टीका केली.