महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे महाराष्ट्रातील पहिले फिरते एटीएम - रोखे घोटाळे

जिल्हा बँकेने महाराष्ट्रातील पाहिले फिरते एटीएम व्हॅन सुरू केली आहे. ही व्हॅन जिल्ह्यातील आठवडी बाजाराच्या ठिकाणी देवस्थानातील यात्रेचे ठिकाणी जाऊन बँकिंग सेवा देणार आहे. मात्र ही सेवा या बँकेत जुन्या ठेवी असणाऱ्या ठेवीदारांना होणार नाही.

एटीएम व्हॅन

By

Published : Feb 6, 2019, 8:32 AM IST

उस्मानाबाद - आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या जिल्हा बँकेने महाराष्ट्रातील पाहिले फिरते एटीएम व्हॅन सुरू केली आहे. ही व्हॅन जिल्ह्यातील आठवडी बाजाराच्या ठिकाणी देवस्थानातील यात्रेचे ठिकाणी जाऊन बँकिंग सेवा देणार आहे. मात्र ही सेवा या बँकेत जुन्या ठेवी असणाऱ्या ठेवीदारांना होणार नाही. ही सेवा निराधार व्यक्तींच्या या बँकेतच होणाऱ्या पगारी त्याचबरोबर शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान विमा अशाच खातेदारांना या फिरत्या मोबाईल एटीएमचा उपभोग घेता येणार आहे.

एटीएम व्हॅन

रोखे घोटाळे, विनातारण कर्जवाटपासह थकीत कर्जवसुलीमुळे जिल्हा बँक आर्थिक अडचणीत आली, ठेवीदार विविध कारणांसाठी पैसे लागणार असल्याने बँकेत चकरा मारू लागले मात्र, त्यांनाही वेळेवर पैसे मिळले नाहीत. जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांची कोट्यावधी रुपयांची वसुली थकली आहे. त्यामुळे बँकेची प्रतिमा पूर्णपणे मलीन आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नाबार्डच्या सहकारामुळे नाबार्डने दिलेल्या अनुदानावर या बँकेने हे फिरत मोबाईल एटीएम व्हॅनची सेवा सुरू केली. निराधार लोकांना व शेतकऱ्यांना गावपोच सुविधा मिळणार आहे. जिल्हा बँकेने हा वेगळा प्रयोग अवलंबला असला, तरी या फिरत्या एटीएम सेवेचा लाभ बँकेतील जुन्या ठेवीदारांना बिलकुलच होणार नाही. फिरत्या एटीएमच्या माध्यमातून इतर बँकेच्या खातेदारांना या एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. जिल्ह्यातील दुर्गम भागात जाऊन हे फिरते एटीएम सेवा पुरविणार असल्यामुळे काही प्रमाणात का होईना ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details