उस्मानाबाद -जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेवा मागील तीन दिवसांपासून बंद आहे. डायलिसिससाठी लागणारा आर.ओ. प्लांट अचानक बंद पडला. या प्लांटमधून दूषीत पाणी येत असल्याने रुग्णालयातील डायलिसिस सेवा बंद करण्यात आली आहे.
उस्मानाबाद : दूषित पाण्यामुळे बंद पडली डायलिसिस सेवा, रुग्णांची गैरसोय उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दररोज कमीत कमी १२ रुग्ण डायलिसिस करण्यासाठी येतात. मंगळवारी सहा रुग्णांची डायलिसिस करणे सुरू असताना अचानक सहा पैकी पाच रुग्णांना थंडी आणि ताप याचा त्रास होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यांच्यावरील डायलिसिसचे उपचार थांबविण्यात आले. डायलिसिससाठी अशुध्द पाणी वापरल्याने रुग्णांना त्रास झाला.
आज जिल्हा शल्यचिकित्सक राजकीय लांडे यांनी दुरुस्ती विभागाला संपर्क साधला. संबंधित इंजिनीअरना बोलावले. डायलिसिस मशीन व शुद्ध पाणीपुरवठा करणारे मशिन याची दुरुस्ती करण्याचे काम करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली.
डायलिसिससाठी येणाऱ्या रुग्णांना तात्पुरत्या स्वरूपात खासगी रुग्णालयात पाठवत येत आहे. या रुग्णांचा बाहेरील रुग्णालयातील खर्च हा जिल्हा रुग्णालयामार्फत देण्यात आहे. आज जिल्हा रुग्णालयातील सर्व मशनरी दुरुस्त करण्यात येईल असे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सांगितले.