महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमच्या मातीत येऊन पवारसाहेबांविषयी बोलण्याची हिंमत कशी होते, धनंजय मुंडेंचा अमित शाहंवर निशाणा - chhatrpati shivaji maharaj

छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यात फुट पाडणाऱ्या अनाजी पंताचे नेतृत्व छत्रपतींच्या वारसांनी स्वीरकारले आहे. ज्यांच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराजांचा सळसळता स्वाभिमान आहे, त्यांचा हा घोर अपमान आहे. असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी उदयनराजे भोसलेंवर निशाणा साधला.

धनंजय मुंडेंचा अमित शाहंवर निशाणा

By

Published : Sep 18, 2019, 11:47 AM IST

उस्मानाबाद - छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यात फुट पाडणाऱ्या अनाजी पंताचे नेतृत्व छत्रपतींच्या वारसांनी स्वीरकारले आहे. ज्यांच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराजांचा सळसळता स्वाभिमान आहे, त्यांचा हा घोर अपमान आहे. असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी उदयनराजे भोसलेंवर निशाणा साधला. तसेच भाजपच्या अध्यक्षांची आमच्या मातीत येऊन, पवार साहेबांविषयी बोलण्याची हिंमत कशी होते असेही ते म्हणाले.

छत्रपतींच्या विचारांचा वारसा शरद पवारांनी पुढे नेला
उस्मानाबादमध्ये आयोजित पक्षाच्या मेळाव्यात मुंडे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा, सुराज्याचे स्वप्न जर कोणी पुढे नेत असेल तर ते पवार साहेब आहेत. गेली ५५ वर्षे राज्यातील शेतकऱ्यांची, गोर-गरिबांची सेवा ज्यांनी केली, त्यांच्या सुख-दुखात सहभागी झाले ते पवारसाहेब या जनतेच्या मनातील राजे असल्याचे ते म्हणाले.

आता भाजपमध्ये सुद्धा विभाजन झाले आहे. भाजप ओरिजनल, आणि भाजप नवभरती. भाजपच्या अध्यक्षांची आमच्या मातीत येऊन, पवार साहेबांविषयी बोलण्याची हिंमत कशी होते. अहो, आमच्या साहेबांनी महाराष्ट्रात जितकी विमानतळं बांधली तितकी बस स्थानकं सुद्धा तुम्ही गुजरातमध्ये बांधली नसल्याचे देखील मुंडे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details