उस्मानाबाद - अतिवृष्टीमुळे ज्या ज्या ठिकाणचे नुकसान झाले आहे, त्या प्रत्येक ठिकाणचा पंचनामा करता येत नसेल तर तेथे मोबाईलने फोटो घेऊन हा फोटोच पंचनामा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी आज उस्मानाबाद येथील पत्रकार परिषदेत केली. फडणवीस हे दोन दिवसांपासून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावरती होते.
मोबाईलमधून काढलेला फोटो पंचनामा म्हणून ग्राह्य धरावा - देवेंद्र फडणवीस - देवेंद्र फडणवीस उस्मानाबाद
अतिवृष्टीमुळे ज्या ज्या ठिकाणचे नुकसान झाले आहे, त्या प्रत्येक ठिकाणचा पंचनामा करता येत नसेल तर तेथे मोबाईलने फोटो घेऊन हा फोटोच पंचनामा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतजमिनीतील माती वाहून गेली असून, पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यात यावी, दीर्घकालीन मदतीसाठी काही दिवस जातील, मात्र यांना तत्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचबरोबर पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, मला असे समजले आहे की काही लोकांना चार हजाराची मदत मिळाली आहे, तर काहींना तीन हजार रुपयांची मदत मिळाली असून, अशा प्रकारे मदत करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले जाते आहे, हे असे प्रकार होऊ नयेत त्याचबरोबर अतिवृष्टीत घरांची पडझड झाली असून, त्यांना तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करून त्यांचे घर बांधण्यासाठी अनुदान देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशीही मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
हेही वाचा -औरंगाबाद- आवक घटल्याने कांद्याच्या दरात वाढ; प्रति किलो १०० रुपये होण्याची शक्यता