उस्मानाबाद - परतीच्या पावसाने महाराष्ट्रात हाहाकार माजवला. या पावसात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते थेट बांधावर जाऊन करत आहेत. या दौऱ्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मदत देण्यावरून कलगीतुरा रंगला आहे. अशात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सरकार पक्षामधील तिनही पक्षात अनेक गोष्टी वरून वाद आहेत. मात्र एका गोष्टीमध्ये या तिघांचेही एकमत असते. ते म्हणजे हात झटकणे... हात झटकण्यात हे तिनही पक्ष तरबेज असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. काही झाले की हे तिघे ही केंद्राकडे बोट दाखवतात असा आरोपही त्यांनी केला. काही करा पण पदरमोड करून पहिले शेतकऱ्याला मदत करा, मुख्यमंत्र्यांनी आता तरी संवेदनशीलता दाखवावी, असे ही ते म्हणाले. फडणवीस उस्मानाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सोमवारी सोलापुरात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. पण अद्याप त्यांनी आश्वासनाशिवाय कोणताही मदत जाहीर केलेली नाही. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष सोमवारी मराठवाडा दौऱ्यावर होते. त्यांनी देखील शेतकऱ्याशी संवाद साधला. आज देवेंद्र फडणवीस उस्मानाबाद येथे पाहणी दौऱ्यासाठी पोहोचले आहेत. या दौऱ्यात त्यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर टीका केली.
राज्य सरकारने कर्ज घ्यावं -
सोमवारी केंद्राच्या मदतीची अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, इच्छा शक्ती असेल तर शेतकऱ्यांना मदत करता येवू शकते. केंद्राने मार्च पर्यंतची जीएसटीची रक्कम राज्याला दिलेली आहे. यातून मदत करता येऊ शकते. तसेच शरद पवार यांनी कर्ज काढण्याचा सल्ला दिला आहे. तो योग्य आहे. कारण राज्याची कर्ज काढण्याची मर्यादा १ लाख २० हजार कोटींची आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत ६० हजार कोटींचेच कर्ज घेतलं आहे.
तिनही पक्ष हात झटकण्यात तरबेज -