महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये शेतात आढळली मगर! - Osmanabad crocodile news

शेतात आढळण्यापूर्वी, ही मगर माकणी लोहारा रस्त्यावरती लोकांना आढळून आली होती. या मगरीची माहिती मिळताच दादासाहेब मुळे यांचे बंधू अण्णासाहेब मुळे यांनी गावातील ग्रामस्थांना व सरपंचांना माहिती दिली.

उस्मानाबादमध्ये शेतात आढळली मगर

By

Published : Oct 30, 2019, 4:08 AM IST

उस्मानाबाद -लोहारा तालुक्यातील माकणी येथील उपसरपंच दादासाहेब मुळे यांच्या शेतात एक मगर आढळून आली. गेल्या पंधरा दिवसापासुन सुरू असलेल्या पावसामुळे निम्न तेरणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असल्याने ही धरणातील मगर बाहेर पडली.

उस्मानाबादमधील शेतात मगर

हेही वाचा -'अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्याचा विषय कधीच ठरला नव्हता.. त्यांना तर पाच वर्षे हवे असेही वाटेल'

शेतात आढळण्यापूर्वी, ही मगर माकणी लोहारा रस्त्यावरती लोकांना आढळून आली होती. या मगरीची माहिती मिळताच दादासाहेब मुळे यांचे बंधू अण्णासाहेब मुळे यांनी गावातील ग्रामस्थांना व सरपंचांना माहिती दिली. गावचे सरपंच विठ्ठल साठे यांच्यासह नागरीकांनी शेतात जाऊन पाहणी केली. त्यानंतर, जेसीबीच्या साहाय्याने या मगरीला बाहेर काढून वनविभागाकडे सोपवण्यात आले आहे.

माकणी,करजागाव, काटे, चिचोली व परिसरातील लोकांनी या मगरीला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details