उस्मानाबाद- देशभरात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अगदी काही दिवसांपूर्वी हाथरसप्रकरणी देशभर गोंधळ उडाला होता. याचप्रमाणे जिल्ह्यातील लोहारा तालुक्यामध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराने महिला अत्याचारांच्या घटनेने पुन्हा डोके वर काढले आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचारप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे महिला आणि महिलांबद्दलच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
'ईटीव्ही भारत'ने गेल्या 9 महिन्यात किती महिलांवर अत्याचार झाला याची माहिती घेतली असता अत्यंत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जानेवारी 2020पासून सप्टेंबर 20 पर्यंत 33 पेक्षा अधिक महिला, मुली आणि अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी बहुतांश आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 34 पेक्षा अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात विनयभंगाच्या तक्रारी काही कमी नाहीत. 345 प्रकरणी जिल्हाभरात जानेवारी ते सप्टेंबर पर्यंत 111 गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तक्रारी देणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुली, तरुणी आणि महिलांचा समावेश आहे. यात 114 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आपली भूमिका चोख बजावली असली तरी गुन्हेगारी वृत्तीची आकडेवारी वाढल्याचे पाहायला मिळते.
घरगुती हिंसाचाराच्या महिन्याकाठी चार घटना -