महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Tuljabhavani Temple Donation: तुळजाभवानीला अर्पण केलेले सोने-चांदी, मौल्यवान वस्तूंची मोजदाद सुरू - पहिल्यांदाच सापडले हिरे

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोने-चांदीची गेल्या 2 दिवसांपासून मोजदाद सुरू आहे. दरम्यान एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. दागिन्यांचे मोजमाप सुरू असताना 354 हिरे भक्ताने दान केल्याचे समोर आले.

Tuljabhavani Temple Donation
दानाचे मोजदाद

By

Published : Jun 11, 2023, 3:40 PM IST

Updated : Jun 11, 2023, 4:20 PM IST

उस्मानाबाद(तुळजापूर) : जिल्हाधिकारी, नियुक्त समिती, आयकर विभागाकडून नियुक्त प्रतिनिधी, धार्मिक व्यवस्थापक, तहसीलदार यांच्या उपस्थितीत ही मोजणी करण्यात आली. तब्बल 15 वर्षांनंतर भाविकांनी तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या दागिन्यांचे मोजमाप सुरू केले.

पहिल्यांदाच सापडले हिरे:तुळजाभवानी मंदिरात दान अर्पण करण्याची एक पद्धत आहे. भाविक सोने-चांदीचे दागिने किंवा हिरे एका पाकिटामध्ये बंद करून दानपेटीत टाकतात. त्यामुळे हे हिरे एकाच भविकाने दिले किंवा नेमके किती भाविकांनी दिले, याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. एवढ्या प्रमाणात देवीच्या दानपेटीत हिरे सापडणे सर्वांना आश्चर्यचकित करणारे आहे. कारण याआधी तिरुपती मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर आणि सिद्धीविनायकाला इतक्या प्रमाणात दान केलेले आपण पाहिले असेल; पण तुळजाभवानी मंदिरात इतक्या प्रमाणात हिऱ्यांच्या दानाची ही पहिलीच घटना असेल.

15 वर्षांनंतर होतेय ऐवजाची मोजणी:तुळजाभवानी देवीला नवसपूर्ती म्हणून अनेक भाविक सोने-चांदीच्या स्वरूपात दान अर्पण करतात. 15 वर्षानंतर सुरू करण्यात आलेली तिजोरीतील दान केलेल्या ऐवजाची मोजणी अजून महिनाभर चालणार आहे. आगामी एक महिन्यात जवळपास 200 किलो सोने आणि 4 हजार किलो चांदीचे मोजमाप करण्यात येणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर त्यांची शुद्धता तपासणी होणार आहे. तुळजाभवानी मंदिरातील सोन्या-चांदीच्या ऐवजाचे मोजमाप दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे.

बिस्कीटाच्या स्वरूपात दान ठेवणार :तुळजाभवानी देवीला भाविकांनी दान केलेल्या सोने-चांदीच्या दागिन्याची मोजणी करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. समितीच्या उपस्थितीत इन कॅमेरा मोजणी सुरू आहे. दान केलेल्या सोन्याची शुद्धताही तपासली जाणार आहे. या मोजदादेनंतर मोजणी झालेले दागिने हे रिझर्व बँकेच्या विशेष समितीकडे पाठवले जाणार आहेत. ही समिती शुद्धतेची पुन्हा एकदा खात्री करून ते वितळून बिस्किटाच्या स्वरूपात मंदिर संस्थांना परत करणार आहे.

हेही वाचा:

  1. Social Media post on Aurangzeb : औरंगजेबाचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचे सोशल मीडियातून आवाहन; मनसेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
  2. Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala: ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा करणार आज पंढरपूरकडे प्रस्थान; लाखो भाविक आळंदीत दाखल
  3. Nath Maharaj Palkhi: नाथ महाराजांची मानाची तिसरी पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ
Last Updated : Jun 11, 2023, 4:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details