उस्मानाबाद- कोरोनाच्या संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळते आहे. देशभरासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे लोकांच्या हातातलं काम सुटलं तर काही लोक अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. हातातले काम नसल्याने रोजंदारीतून मिळणारा पैसाही मिळणे बंद झाले आहे
उस्मानाबाद शहरातील अशीच एका कुटुंबाची एक घटना पुढे आली आहे. 'किराणा संपलाय हो, आम्ही उपाशी आहोत, आम्हालाही धान्य द्या, माझ्या आईने देवा घरी जाण्यापूर्वी किराणा भरला होता मात्र गेल्या महिन्यात आई गेली त्यावेळेपासून आहेत या किराणावरतीच आमची भूक भागवत आहोत. मात्र, आता घरातील सगळं संपलं असून आम्हालाही मदत करा', अशी आर्त हाक हतबल कुटुंबातील बहिण भावाने दिली आहे. त्यांनी फोन करुन आपल्या भागातील एका नगरसवेकाला सांगितले.