उस्मानाबाद - कोरोना व्हायरसने देशभर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे गेली कित्येक दिवस रिक्त असलेल्या आरोग्य विभागातील जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मात्र, कोरोना व्हायरासच्या भीतीपोटी शासकीय सेवेत डॉक्टर म्हणून नोकरी करण्यासाठी नवनिर्वाचित एमबीबीएस डॉक्टरांचा प्रतिसाद देत नसल्याचे समोर आले आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागातील पद भरतीसाठी वैद्यकीय क्षेत्रात उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांना आमंत्रित केले होते. मात्र, या भरतीकडे एमबीबीएस डॉक्टरांनी पाठ फिरवली आहे.
नवनिर्वाचित डॉक्टरांमध्ये कोरोना व्हायरची भीती... हेही वाचा...'वैद्यकीय व पोलीस क्षेत्रातील घटकांचे अभिनंदन गरजेचे'
एरवी शिपायाच्या पदासाठी अर्ज मागविण्यात आले, तर वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळ्या पदवी संपादन केलेल्या लोकांबरोबरच इंजिनियर आणि कायदेविषयक ज्ञान घेतलेले तरूणदेखील शिपाई पदासाठी अर्ज करतात. शासकीय नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करतात, साधारण दहा जागेसाठी अर्ज मागवले तरी दहा हजाराच्या आसपास सुशिक्षित बेकार तरुण नोकरी मिळवण्यासाठी रांगेत उभे राहतात. मात्र, कोरोनाच्या भीतीपोटी वैद्यकीय क्षेत्रात शासकीय नोकरदार म्हणून काम करण्यास एमबीबीएस डॉक्टर सध्या अनुत्सुक आहेत.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात 8 आणि जिल्हा रुग्णालयात 3 जागेसाठी एमबीबीएस झालेल्या डॉक्टरांचे अर्ज मागवण्यात आले होते. मात्र, या जागेसाठी एमबीबीएस डॉक्टरांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ही भरती पुढे ढकलण्यात आली आहे. तदर्थ वैद्यकीय अधिकारी पदासाठी बोटावर मोजण्याइतक्या तरुणांनी अर्ज केले. यातील 11 एमबीबीएस डॉक्टरांची मुलाखत घेऊन जिल्हा परिषद आरोग्य विभागत 8 पैकी 4 डॉक्टरांच्या जागा भरण्यात आल्या आहेत. तर जिल्हा रुग्णालयात 3 पैकी 2 डॉक्टरांनी काम करण्यास पसंती दिली आहे.
हेही वाचा...कोरोना विषाणूच्या परिस्थितीत सार्वजनिक आरोग्याचे महत्त्व..
कोरोना व्हायरस वाढत असलेला प्रसारामुळे सामान्य लोकांच्या मनात प्रचंड भीती आहे. अशा भीतीच्या वातावरणात काही डॉक्टर स्वतः च्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे सामान्य लोकांच्या मनात अशा डॉक्टरांविषयी दैवत्वाची भावना निर्माण झाली आहे. मात्र, काही डॉक्टर कोरोनाच्या भीतीपोटी शासकीय सेवेत भरती होण्यासाठी प्रतिसाद देत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील भरती काही काळासाठी का होईना, परंतु खोळंबली आहे.