महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाग्रस्त महाराजाने काढला कोविड सेंटरमधून पळ - उस्मानाबाद महाराज न्यूज

उस्मानाबादमधील कोविड सेंटरमधून एका कोरोनाबाधित महाराजाने पळ काढला. कोविड सेंटरमध्ये कोणीही सेवा करत नाही, योग्य ती काळजी घेत नाही, त्यामुळे आपण पळून गेल्याचे महाराजाने सांगितले. शेवटी विनंती करून महाराजाला पुन्हा कोविड सेंटरमध्ये नेण्यात आले.

Sadhu
साधू

By

Published : Aug 15, 2020, 4:01 PM IST

Updated : Sep 2, 2020, 7:32 PM IST

उस्मानाबाद - जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका महाराजाने चुपचाप पळ काढल्यामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली. या कोरोनाग्रस्त महाराजाचा तातडीने शोध घेऊन अक्षरशः विनंती करून त्याला परत आणावे लागले.

कोरोनाग्रस्त महाराजाने काढला कोविड सेंटरमधून पळ

आज सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान या महाराजाने आरोग्य यंत्रणेची नजर चुकवून रुग्णालयातून धूम ठोकली. ही बाब लक्षात आल्यानंतर कोरोनाबाधित महाराजाची शोधाशोध सुरू झाली. नगरपालिकेच्या नाट्यगृहाजवळ हा महाराज असल्याचे समजले. त्यानंतर पोलीस, आरोग्य विभागाचे कर्मचारी रुग्णवाहिकेसह या ठिकाणी पोहोचले. मात्र, हा महाराज रुग्णवाहिकेमध्ये बसण्यास तयार नव्हता. कोविड सेंटरमध्ये कोणीही सेवा करत नाही, योग्य ती काळजी घेत नाही, त्यामुळे आपण पळून गेल्याचे महाराजांनी सांगितले. शेवटी विनंती करून महाराजाला पुन्हा कोविड सेंटरमध्ये नेण्यात आले. मात्र, या सर्व प्रकारामुळे आरोग्य विभागाचे धिंडवडे निघाले असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

Last Updated : Sep 2, 2020, 7:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details