उस्मानाबाद - कोरोना महामारीच्या भीतीने नात्यांमध्येही दुरावा निर्माण झाला असल्याचे पाहायला मिळाले आहे. परंडा तालुक्यातील कुक्कडगाव येथील मुलाने जन्मदात्या बापावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. त्यामुळे उस्मानाबाद नगरपालिकेने मुलाची भूमिका बजावत भागवत किसन पवार यांच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत.
कोरोनामुळे ओशाळली नाती; जन्मदात्या बापावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुलाचा नकार - corona positive died in osmanabad
परंडा तालुक्यातील कुक्कडगाव येथील मुलाने जन्मदात्या बापावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. त्यामुळे उस्मानाबाद नगरपालिकेने मुलाची भूमिका बजावत भागवत किसन पवार यांच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत.
कुक्कडगाव येथील महिला कोरोना पॉझिटिव्ह होती. त्यामुळे या महिलेच्या संपर्कातील सर्वांना क्वारंटाईन करून स्वॅब घेण्यात आले होते. यात महिलेच्या पतीचे स्वॅब घेतले होते. पतीला दमा आणि अन्य आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी भागवत पवार यांना कोरोनाची बाधा झाली नसल्याचा अहवाल आला होता. मात्र, उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात पवार यांचा मृत्यू झाला. त्यानंतर भागवत पवार यांच्या मुलाला संपर्क साधला. मात्र, कोरोनाच्या धास्तीमुळे मुलाने जन्मदात्या बापाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे या मृतदेहावर उस्मानाबाद नगरपालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.