उस्मानाबाद - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाबाधितांची संख्या ही अडीचशेच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत 235 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यापैकी 175 पॉझिटिव्ह रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून जिल्ह्यात १२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचा दर हा 5.1 टक्के आहे, तर उपचारानंतर बरे होण्याचे प्रमाण 74.46 टक्के आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
दिलासादायक! उस्मानाबादेत कोरोना मृत्यूदर पाच, तर कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 74 टक्के - उस्मानाबाद कोरोना रूग्ण मृत्यूदर
उस्मानाबादमध्ये आत्तापर्यंत 235 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यापैकी 175 पॉझिटिव्ह रुग्ण, उपचारानंतर बरे झाले असून जिल्ह्यात १२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचा दर हा 5.1 टक्के आहे, तर उपचारानंतर बरे होण्याचे प्रमाण 74.46 टक्के आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन दिवसांत 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून बुधवारी जिल्ह्यात ६ रुग्ण आढळले आहे. यात उस्मानाबाद शहरातील एमआयडीसी भागाताल २ रुग्णांचा समावेश असून हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे. तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथे दोन रुग्ण सापडले असून ते एका कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले होते. उमरगा डिग्गी रोड परिसरातही २ नवीन रुग्ण सापडले असून ते सुद्धा पूर्वीच्या एका रुग्णाच्या संपर्कातील आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली.