महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनामुळे जूनमध्ये सुरू होणाऱ्या शाळा बंद, विद्यार्थी मध्यान्ह भोजनापासून वंचित - osmanabad latest news

सद्य कोरोनामुळे शाळा बंद आहेत. यामुळे मध्यान्ह भोजनही दिले जात नाही. जोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत, तोपर्यंत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन मिळणार नाही.

corona pandemic : Schools, Colleges Not to Open in June
सद्य कोरोनामुळे शाळा बंद आहेत. यामुळे मध्यान्ह भोजनही दिले जात नाही. जोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत, तोपर्यंत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन मिळणार नाही.

By

Published : Jun 25, 2020, 9:10 AM IST

उस्मानाबाद- राज्यात दिवसागणिक कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे १५ जून दरम्यान, सुरू होणाऱ्या शाळा अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. याचा परिणाम विद्यार्थांच्या शैक्षणिक वर्षावर होत आहे. याशिवाय विद्यार्थी शाळेमध्ये दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनापासून वंचित राहत आहेत.

शाळा सुरू झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना ज्ञान आणि मध्यान्ह भोजन मिळणार नाही. शाळेतील मुलांची गळती कमी करण्यासाठी, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी आणि शाळेतील नव्या भरतीमध्ये वाढ करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली. पण सद्य कोरोनामुळे शाळा बंद आहेत. यामुळे मध्यान्ह भोजनही दिले जात नाही. जोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत, तोपर्यंत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन मिळणार नाही.

जिल्ह्यातील विद्यार्थी आणि शाळा -
जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये 1 हजार 534 जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. यात जवळपास 1 लाख 80 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी अशी वर्गवारी करून मुख्याध्यापक, गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे मध्यान्ह भोजनाच्या धान्याची मागणी करतात. प्रति विद्यार्थ्याला साडेचार किलो तांदूळ आणि 1 किलो डाळ दिली जाते, अशी माहिती कार्यालयीन अधीक्षक रामलिंग काळे यांनी दिली.

दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी बाहेरून येणाऱ्या लोकांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये क्वारंटाइन करण्यात येत आहे. त्यामुळे लगेच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला तरी शाळेला सॅनिटायझर करावे लागणार आहे.

असे दिले जाते प्रति विद्यार्थी मागे प्रती दिन धान्य -

  • तांदूळ - 100 ते 150 ग्राम
  • दाळ - 20 ते 30 ग्राम
  • तेल - 5 ते 7 ग्राम
  • मीठ - 2 ते 3 ग्राम
  • तिखट - 15 ते 20 ग्राम
  • भाजी - 50 ते 75 ग्राम

हेही वाचा -उस्मानाबाद : निवृत्त वाहकाचा मुलगा झाला उपजिल्हाधिकारी, अन्य सातजण 'एमपीएससी' उत्तीर्ण

हेही वाचा -पेरलेले बियाणे उगवत नसेल तर, संबधीत कंपनीवर कारवाई करू - कृषीमंत्री दादा भुसे

ABOUT THE AUTHOR

...view details